खालील कविता वाचताना मनाला ठेच लागली. आपण ज्या देशात राहतो तीच भारतमाता विकली जातेय. मतदार राजानों लक्षात ठेवा तुम्ही जर उमेदवार वा अन्य व्यक्ती कडून मतदानासाठी कोणत्याही प्रकारची लाच घेत असाल तर तुम्हीच जबाबदार आहात आर्थिक गरिबीला, लाखोंच्या बेरोजगाराला, कोवळ्या वयात बलात्काराच्या वासनेला बळी पडणार्या प्रत्येक चिमुकल्या जिवाला, तुम्हीच जबाबदार आहात भ्रष्टाचार, अत्याचार, खुण व लाचारीला कारण ते तुम्हाला पैसे देवून मत नाही तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेतात. त्यामुळे लक्षात ठेवा मतदान हा आपला अधिकारच नव्हे तर कर्तव्य देखील आहे. योग्य उमेदवार निवडणे हेच जागरुकतेचे लक्षण आहे. क्षणीक मोहाला बळी पडून आपले अधिकार गमवू नका. मनात स्वाभिमानाची अस्मिता तेवत ठेवून विकासाला मतदान करा..योग्य मतदान करा फरक पडतो.
देश विकताना पाहिला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
माझा देश विकताना पाहिला
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीला
देशाला घडवण्याचे अमीष दाखवुन
देश दारुत बुडवताना पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
माझा देश विकताना पाहीला
इतक्या दिवस साड्या ओढणारा
अचानक साड्या वाटताना दिसला
त्याच्या डोळ्यांतला तो निर्दयी स्वार्थ
मी माझ्या डोळ्यांनी पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
माझा देश विकताना पाहीला
गरिबांना पायदळी तुडवणारा
आता त्यांच्या पाया पडताना दिसला
गरिबांच्या झोपडीकडे जाताना
त्याचा जोडा केवढा घासला
वरवरच्या प्रेमाचा डाव मी त्याच्या तोंडावर पाहीला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी देश विकताना पाहीला
लोकशाही ढाब्यावरच बसुन त्याने
आज दडपशाही मतदानाला आणली
देशाच्या स्वप्नांची सुंदर रांगोळी
त्या फुकट वाटलेल्या दारुनेच धुतली
त्या वाहणा-या विषारी दारुत
मला माझा देशही वाहताना दिसला
निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी
माझा देश विकताना पाहिला
कुठे हजारात, कुठे पाचशेत
बरबाद होताना पाहीला
........--------...........

Popular
Tags
Videos
0 comments:
Post a Comment